मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा तडाखा; 27 जण दगावले, तर 392 जनावरांचा मृत्यू

Marathwada Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच (Marathwada Rain Update) धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस बरसल्याचं दिसून आलंय. विशेषत: मराठवाड्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून अवकाळी पावसामुळे आत्तापर्यंत मराठ्यावाड्यातील 27 जणांचा मृत्यू झाला असून 392 जनावरे दगावली आहेत. बीडमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.
मोठी बातमी! कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू
मराठवाड्यात वीज पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने वीज अटकाव यंत्रे वाढवण्याच्या सूचना मान्सूनपूर्व बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. सध्या मराठवाड्यात 503 वीज अटकाव यंत्रे आहेत. त्यातील फक्त बीडमध्ये 308 वीज अटकाव यंत्रे आहेत.
मान्सूनपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतली. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 तर जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन आणि धाराशिव परभणीमध्ये चार वीज अटकाव यंत्रे आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वीज अटकाव यंत्राची मागणी जोर धरु लागली आहे.
वीज पडून होत असलेले मृत्यू कमी करायचे असतील तर वीज मराठवाड्यात वीज अटकाव यंत्रे वाढवाी लागणार आहेत. यासोबतच दामिनी आणि सचेत हे दोन अॅप मोबाईलमध्ये घेतल्यास वीज पडू शकणार आहे की नाही याचा अंदाज मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील १४ प्रमुख नद्यांवर आठ जिल्ह्यांतील ६५५ गावे पूरप्रवण असल्याने या गावांत कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.केवळ माॅन्सूनपूर्व आढावाच नाही, तर राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्येही मराठवाड्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचा आढावा घेतला जात आहे