राज्यात पावसाच आगमन; दोन दिवस वादळी जोर कायम राहणार; हवामान विभागाने काय दिला अंदाज?

Maharashtra Weather : राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून (Weather) पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर, रविवारी काही भागात पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सोमवारी पावसाचा जोर कोकण आणि विदर्भातील काही भागात कमी होण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
पीक विमा योजनेत फारसं पीक हाती येत नाही; मुदतवाढ मिळूनही पीक विमा भरण्याकडं शेतकरी फिरकेना
विदर्भातील अनेक भागात मागील ४ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे अनेक भागात पिकांचे नुकसानही झाले. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया जिल्ह्यात पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाडा आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाने पिकांना दणका दिला.
हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर संपूर्ण कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसंच, उद्या संपूर्ण विदर्भ, संपूर्ण कोकण, धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.
चंद्रपूर, गोंदीया, पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील १६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील इतर जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.