Download App

महिला, मुली सुरक्षित आहेत का? बदलापूर घटनेवरून रूपवतेंचा सरकारवर निशाणा

Utkarsha Rupwate : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) झाल्याची घटनेमुळे संपूर्ण देशात

  • Written By: Last Updated:

Utkarsha Rupwate : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) झाल्याची घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात ह्या घटना वाढत आहे त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव म्हणणारे पण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना का थांबत नाहीत. असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी विचारला आहे.

आप – आपसातल्या भांडणामध्ये आणि एकमेकांचे पक्ष फोडण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की यांनी महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे अशी टीका देखील यावेळी रुपवते यांनी राज्य सरकारवर केली.

बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यापाठोपाठ राज्यभर तीव्र आंदोलने देखील करण्यात आली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. वारंवार बदलापूर सारख्या घटना घडत असून पोलीस आणि सरकारची भित गुन्हेगारात राहिलेली नाही अशा शब्दात उत्कर्षा रूपवते यांनी सरकारवर कडव्या शब्दात निशाणा साधला.

ते पक्ष फोडण्यात व्यस्त, महिला सुरक्षा टांगणीवर महिला, मुली सुरक्षित आहेत का? बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार घटना ही काही पहिली घटना नाही गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात ह्या घटना वाढतच चाललेल्या आहेत. बेटी बचाव, बेटी पढाव म्हणणारे पण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना का? थांबत नाहीत. असा सवाल देखील यावेळी रूपवते यांनी विचारला.

पारनेरची जागा राष्ट्रवादी की शिवसेनेला…अंधारेंनी मंचावरूनच सांगून टाकल

हे सर्वजण आप – आपसातल्या भांडणामध्ये आणि एकमेकांचे पक्ष फोडण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की, यांनी राज्यातील महिलानांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे आणि त्यामुळे वारंवार बदलापूर सारख्या घटना घडत असा आरोप देखील त्यांनी वेळी केला. तसेच पोलीस आणि सरकारची भित गुन्हेगारात राहिलेली नाही असं देखील यावेळी उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.

follow us