Beed News : बीडमधून एक बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी (Beed) असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. संदीप तांदळे असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवीगाळ केली आहे. तसंच या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
आमदार सुरेश धसांना वाल्मीक कराडने अनेक प्रकरणातून वाचवलं, असा दावा या व्हिडिओत तांदळे याने केला आहे. संदीप तांदळे हा वाल्मिक कराडचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे. संदीप तांदळेने 307 च्या कलमांतर्गत तीन केसेस बाळा बांगर यांच्यावर दाखल केल्या होत्या. संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर खंडणी, पोक्सो अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे देखील गुन्हे दाखल आहेत.
छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यावरील हल्ला सुनील तटकरेंनीच; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असून, तो वाल्मीक कराडचा समर्थक आणि सहकारी आहे. आण्णा बाहेर आल्यानंतर सर्वांनाच बघणार अशी धमकी देखील या व्यक्तीनं या व्हिडीओमध्ये दिली आहे. दरम्यान बाळा बांगर उर्फ विजयसिंह बांगर यांनी अनेकदा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केली, तसेच या प्रकरणातील आय व्हिटनेसला देखील संपवले, असा दावा विजयसिंह बांगर यांनी केला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नीने आरोपींना अटक करावी या मागणीसाठी विष प्राशन केल्याची घटना घडली होती.