Download App

मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘वंचित’ ची पहिली यादी जाहीर, दोन बुद्धिस्ट तर, एका तृतीयपंथीला उमेदवारी

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू  झालेली नाही.

  • Written By: Last Updated:

मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू  झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आघाडी घेता आगामी विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात 11 जणांच्या नावाचा समावेश असून, केवळ दोन बुद्धिस्टांनाच यात स्थान देण्यात आले आहे. रावेरमधून वंचितने तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली असून, शमिभा पाटील या लेवा पाटील समाजातील आहेत. (Vanchit Bahujan Aghadi Candidate List For Assembly Election )

कुणा-कुणाला मिळाली संधी? 

– रावेर – शमिभा पाटील
– शिंदखेड राजा – सविता मुंढे
– वाशिम – मेघा किरण डोंगरे
– धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
– नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
– साकोली – डॉ. अविनाश नान्हे
– नांदेड दक्षिण- फारुख अहमद
– लोहा – शिवा नारांगले
– औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
– शेवगाव – किसन चव्हाण
– खानापूर – संग्राम कृष्णा माने

माझ्या भाषणाची स्टाईल बदलवणारा मास्टर माईंड ‘नाना’; फडवीसांनी खुल्यामनानं सांगितलं…

रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

वंचितने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवलं आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत. शमिभा पाटील या लेवा पाटील समाजातील आहेत.

follow us