वर्षा निवासस्थानावरील बैठक खेळीमेळीत झालीय, संभ्रम निर्माण करुन राजकीय पोळी भाजू नका, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना सज्जड दम भरलायं. दरम्यान, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याची माहिती समोर आली होती. तर वर्षा निवासस्थानावर शिवेसेनच्या झालेल्या बैठकीत दोन आमदारांची मंत्रिपदावरुन जुंपल्याच्याही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अॅवार्डसाठी शाहरूखने देऊ केली होती लाच; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा
उदय सामंत म्हणाले, कालच्या बैठकीत सर्वच आमदारांची हजेरी होती. बैठकीमध्ये आगामी विधानसभा आणइ लोकसभेच्या अधिवेशनात कसं कामकाज करावं, संघटनात्मक पक्षबांधणीचे निर्देश देण्यात आले आहेत. जे घडलंच नाही त्याची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन पोळी भाजण्याचा प्रकार राजकारणी करीत असल्याचा आरोप सामंतांनी केला आहे. मात्र, जे कोणी संभ्रम पसरवत आहेत त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नसल्याचंही सामंतांनी ठामपणे सांगितलंय.
शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता, मंत्री विखे पाटलांची माहिती…
तसेच शिवसेनेत आम्ही उठाव केला आहे त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुती 200 आमदार घेऊन माहारष्ट्राला स्थिर सरकार देत असेल तर आम्हाला कोणाचीही आवश्यकता नसल्याचं सामंतांनी ठणकावून सांगितलं आहे.
Aamir Khanने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, “राजकुमार हिरानींसोबत करणार…”
यावेळी बोलताना सामंतांनी विरोधकांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, आम्ही बंड केल्यानंतर वैयक्तिक पातळीवर टीका, शिवीगाळ, केली जात होती. आमचं सरकार कधी पडणार ती तारीखही विरोधकांकडून घोषित करण्यात येत होती, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरु असलेली विकासकामे पाहुन राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्या सरकारमध्ये सामिल झाल्याने हेच विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.
विरोधकांच्या टीकेवर बोलताना उदय सामंत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आम्ही राजीनामे देणारे नाहीतर घेणार लोकं आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपूर्वीच दाखवून दिलं आहे. आमच्या सर्वच आमदारांसह, खासदार कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत.