अॅवार्डसाठी शाहरूखने देऊ केली होती लाच; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा
Shahrukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरेल असे चित्रपट दिले आहेत. त्याचा अभिनय, डान्स, स्टईल या सगळ्यांसह त्याच्या वयक्तिक आयुष्यामध्ये देखील चाहते प्रचंड रस दाखवतात. शाहरूखच्या यावर्षी आलेल्या पठाण चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत नवे विक्रम निर्माण केले आहेत. त्याचबरोबर त्याच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. मात्र एकादा त्याने पुरस्कार मिळवण्यासाठी थेट लाच दिल्याचा देखील दिली होती. याबद्दल स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. (Shahrukh Khan expose secrets about when he try to pay for got Award )
मी अन् फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार; घाटगेंच्या विधानाने मुश्रीफांना धडकी
काय म्हणाला शाहरूख?
लाच दिल्याचा हा प्रकार शाहरुख खानने सांगताना म्हटले होते की, जेव्हा मानसाला काही मिळवायचे असते. तेव्हा तो अत्यंत वाईट पद्धतीने ती मिळवतो. ज्याप्रमाणे लोक संपत्ती मिळवण्यासाठी उतावळे असतात तसेच मी पुरस्कार मिळवण्यासाठी उतावळा झाला होतो. कारण मला वाटत होते मी पुरस्कार मिळवण्यास पात्र आहे. म्हणून मी एडिटरकडे गेलो आणि म्हणाले की, मला हा पुरस्कार हवा आहे. हवं तर मी त्यासाठी पैसे द्यायलाही तयार आहे. मात्र त्यांनी मला सांगितले की, अशाप्रकारे पुरस्कार मिळत नाही. तुम्ही चांगले काम केले असेल तर लोक तुम्हाला मत देतील.
Ahmednagar News : ज्वालाग्रही पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला पेट, 4 जण होरपळले..
पुरस्कार मिळवण्याची त्याची आतुरता मात्र तरी देखील संपलेली नव्हती. म्हणूनच की काय त्याच्याच चित्रपटातील संवादाप्रमाणे ‘अगर किसी चीज को पुरे दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे आपको मिलाने मे लग जाती हैं’ अगदी तसच झालं. त्यावर्षीचा बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार शाहरूखला मिळाला. मात्र हा पुरस्कार त्याला पैसे देऊन नाही तर लोकांच्या मतदानामुळे मिळाला होता. हा पुरस्कार मिळाल्यावर शाहरूखने व्यासपीठावरच ज्या एडीटरला पुरस्कारासाठी पैसे देण्याचं म्हटलं होत त्यांची माफी मागितली होती.
दरम्यान अमेरिकेमध्ये शाहरूख खानला एका सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याअगोदर देखील २०१३ मध्ये आलेल्या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी किंग खानच्या ८ सर्जरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर २०१७ मध्ये किंग खान रईस शुटींगवेळी जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि गुडघ्यांवर चांगलीच इजा झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली होती.