Ahmednagar News : ज्वालाग्रही पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला पेट, 4 जण होरपळले..
अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात भर रस्त्यावरच ज्वालाग्रही पदार्थ वाहुन नेणाऱ्या टॅंकरने पेट घेतल्याची घटना घडलीय. पाथर्डी तालुक्यातील राज्य महामार्गावरच असलेल्या केळवंडी गावात ही घटना घडलीय. भीषण अपघात झाल्यानंतर या टॅंकरने अचानक पेट घेतला आहे. दरम्यान, ट्रकच्या आगीत 4 जण गंभीरपणे भाजल्याची माहिती मिळत असून काही प्रवासी महिला ट्रकमध्ये अडकल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Politics : पवारांच्या राजकारणापासून परिवारही सुटला नाही; बावनकुळेंचं टीकास्त्र
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात हा टॅंकल पलटी झाला. या अपघातानंतर संबंधित टँकरने पेट घेतला व पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची भीषणता पाहता टँकर जवळ कोणालाही जाता आले नाही. आगीचा भडका वाढल्याने घाटातील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली.
आमदारांच्या पत्नींना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं; अजित पवारांकडून शरद पवारांचा समाचार
दरम्यान, या ज्वालाग्रही पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकरमधून दोन महिला या प्रवास करत होत्या. दरम्यान या आगीच्या घटनेमध्ये दोन प्रवासी महिला या टँकरमध्येच अडकून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या अपघातात इतर 4 जण गंभीररित्या भाजले असून त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
दरम्यान, टँकरला लागलेली आग अतिशय भीषण स्वरूपाची असल्याने त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली असून बचाव कार्यात अडथळा येत आहे. अद्यापपर्यंत अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.