Aamir Khanने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, “राजकुमार हिरानींसोबत करणार…”

Aamir Khanने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, “राजकुमार हिरानींसोबत करणार…”

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट गेल्या काही दिवसाअगोदर चाहत्यांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. यामुळे आमिरने सिनेसृष्टीपासून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता तो पुन्हा तो मनोरंजनसृष्टीमध्ये कमबॅक (Comeback) करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमिरने गेल्या काही दिवसाअगोदर मनोरंजनसृष्टीपासून थोडासा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु आता पुन्हा एकदा तो कमबॅक करत असल्याने चाहते अगदी आनंदी होत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ (3 Idiots) या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा आमिरला रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी चाहते मोठे उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आमिरने कमबॅकबद्दल मोठे भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की अजून मानसिक तयारी झाली नाही.

तसेच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटानंतर आमिरने कोणताही चित्रपट केला नाही. परंतु आता आमिरचे नाव एका बायोपिकबरोबर जोडलं जात आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, आमिर खान (Aamir Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) पुन्हा एकदा सोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट बायोपिक असणार आहे. राजकुमार हिरानीबरोबर काम करण्यासाठी आमिरने होकार दिल्याचे सांगितले आहे. आमिर खानच्या पुढल्या वर्षी २०२४ मध्ये बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

राजकुमार हिरानी सध्या किंग खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटासाठी दिग्दर्शन करत असल्याचे समोर आले आहे. आमिर खान आणि राजकुमार हिरानीची जोडी ही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट जोडी असल्याचे सांगितले आहे. आमिर आणि राजकुमार हिरानी यांनी २००९ साली ‘३ इडियट्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होते. त्यानंतर त्यांनी ‘पीके’ हा चित्रपट केला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. आता राजकुमार हिरानी आणि आमिरच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. आमिर-राजकुमारचा आगामी बायोपिक कोणता असणार आहे? या चित्रपटात नेमके कोणते कलाकार असणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube