बुलढाणा : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे अनेकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढून घेत असतात. पुन्हा एकदा खोत यांनी बुलढाण्यात एक वादग्रस्त विधान केले आहे. या देशातील 80 कोटी जनता आयते बसून खातेय. हे ऐतखाऊ आहेत. त्यामुळे रेशन व्यवस्था (Ration Scheme) कायमची बंद केली पाहिजे. नाही तर हा देश भिकाऱ्यांचा आहे, अशी प्रतिमा निश्चित निर्माण होईल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
अमित शाहांवर बोलणं राहुल गांधींच्या अंगलट; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
सदाभाऊ खोत म्हणाले, शेतीवरील समाज केवळ चाळीस टक्के आहे. देशातील एेतखाऊ ८० टक्के जनता आहे. सगळ्याना वाटते गव्हू, तांदूळ फुकट मिळाले पाहिजे. तेल स्वस्त मिळाले पाहिजे. कांदा, बटाटा, टोमॅटो, स्वस्त मिळाला पाहिजे.
‘मंत्र्यांनीच सभा घेतल्या तर सगळचं अंदाधुंदी’; भुजबळांच्या सभेवर सुळेंचं बोट
देशामध्ये एेतखाऊंची संख्या वाढायला लागली आहे. मी जबाबदारीने बोलत आहे. या देशातील रेशन व्यवस्था पहिल्यांदा बंद केली गेली पाहिजे. 80 कोटी माणसे जर बसून खात असतील. तर हा देश कृतघ्नतेचा नाही, तर हा देश भिकाऱ्यांचा आहे, अशी प्रतिमा या देशाची निश्चित तयार होईल, असेही खोत यांनी म्हटले आहे. खोत यांच्या या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
फुकट वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा
सध्या रेशनवर फुकटात धान्य देण्यात येत आहे. मध्यंतरी मोदी सरकारने फुकटात धान्य देण्याच्या योजनेला आणखी मुदतवाढ दिली आहे. त्यावरही भाष्य करताना खोत म्हणाले, सर्वांना फुकट वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे भिकाऱ्यांचा देश बनत चालला आहे. प्रत्येकाने कष्ट करावेत, त्यातूनच देश बलशाली होईल. सदाभाऊ खोत हे रोखठोक आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत असतात. टोमॅटो महाग झाले होते. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी टोमॅटो मिळाला नाही म्हणून कोणी मेले का ? असा सवालही खोत यांनी केला होता.