Download App

आम्ही अजितदादांसाठी कामाला लागलोय; मंत्रिमंडळातील मोठ्या नेत्यानं दंड थोपटले

  • Written By: Last Updated:

Darmababa Atram On Ajit Pawar CM Post : मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनीदेखील डोके वर काढले होते. त्या चर्चांना थोडासा पूर्णविराम मिळत नाही तोच काल (दि. 27) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईल हा व्हिडिओ ट्विट करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. त्यानंतर आता अजितदादांच्या शिलेदार आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मोठ्या मंत्र्यानं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आपण कामाला लागलो असल्याचे म्हणत दंड थोपटले आहे. त्यात येत्या काही दिवसात शिंदेच्या आमदार अपात्रतेवरदेखील निकाल येणे अपेत्रित आहे. त्यामुळे आता अजित पवार खरचं मुख्यमंत्री होणार का? की, फडणवीसांचं मी पुन्हा येणार विधान सत्यात उतरणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

“पंतप्रधान पद प्रतिष्ठेचे, नीट माहिती द्या” : 10 वर्षांच्या कामांचा पाढा वाचत पवारांचा PM मोदींवर पलटवार

काय म्हणाले धर्मबाबा अत्राम?

अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे म्हणत, ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील असा विश्वासदेखील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मबाबा अत्राम (Dharmababa Atram) यांनी व्यक्त केला आहे. मी विदर्भात, अजित पवार राज्यात फिरून जास्तीत जास्त जागा निवडून आणणार आहे. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलं नाही. पण महायुतीमध्ये असल्याने त्यावर आता जास्त बोलणार नसल्याचे यावेळी अत्राम म्हणाले. तिन्ही पक्षाचे नेते बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील असे म्हणत अजितदादांचा प्रशासनावर दबाव आहे आणि त्यामुळे करोडो मतदरांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं वाटत आहे. मात्र, सत्तेत तीन सहकारी असल्यानं तिन्ही पक्षांना वाटत आपला नेता मुख्यमंत्री व्हावा.

अजितदादांना बारामतीतच बंदी! मराठा समाजाच्या प्रचंड विरोधामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की

अजितपवारांकडून खंडन

एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची गच्छती होणार आणि अजितदादांची या पदावर वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी मोठं पेव फुटलं होते. एवढेच नव्हे तर, राज्यातील अनेक भागात अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणूनदेखील पोस्टर लागले होते. या सर्व चर्चांमध्ये स्वतः अजितदादांनी या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यांना मी मुख्यमंत्री व्हाव असं वाटतं. पण, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कारभार व्यवस्थित सुरू असल्याचे म्हणत या सर्व चर्चांचं त्यांनी खंडन केले होते.

Tags

follow us