अजितदादांना बारामतीतच बंदी! मराठा समाजाच्या प्रचंड विरोधामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की
बारामती : माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रद्द केला आहे. “शेतकऱ्यांच्या हाताने गळीत हंगामाचा शुभारंभ करा, अशा सूचना करत त्यांनी या कार्यक्रमासाठी बारामतीला (Baramati) न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar has canceled the tour of Malegaon Cooperative Sugar Factory)
राज्यात मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. मराठा समाजाने राज्यातील अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून मराठा समाजाने अजित पवारांच्या दौऱ्यालाही विरोध केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर माळेगाव साखर कारखान्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अजितदादांच्या आणखी एका आमदाराला पवारांचा धक्का; भाजपमधील थेट माजी मंत्र्यांलाच फोडलं
अजितदादांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा तीव्र विरोध :
शनिवारी (२८ ऑक्टोबर) अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार होता. अजित पवार येणार असल्याने कार्यक्रमाची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाकडून अजितदादांच्या या दौऱ्याला तीव्र विरोध करण्यात आला. “अजित पवार यांना या कार्यक्रमाला बोलावू नका. आम्ही त्यांना येथे पाय ठेवू देणार नाही. अन्यथा संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन कारखान्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे माळेगाव साखर कारखाना प्रशासनाला आणि माळेगावच्या पोलीस ठाण्याला मराठी क्रांती मोर्चाने दिला होता.
Rohit Pawar : पुन्हा येण्याच्या मोहापायी…’बॉम्बे डायमंड बुर्स’ स्थलांतरावरून सुळेंनंतर रोहित पवारांचंही टीकास्त्र
दरम्यान, एका मराठा आंदोलकाने ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले, “अजित पवार यांनी या दौऱ्यावर येऊ नये यासाठी आम्ही कारखाना आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिले होते. यासंदर्भात शुक्रवारी पोलीस आणि कारखाना प्रशासनासोबत बैठक देखील पार पडली. पण अजित पवार यांना आणण्यासाठी कारखाना प्रशासन आग्रही होते. कारखाना प्रशासन ऐकत नसेल तर आम्हीही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. गाड्यांना आडवण्याची आणि लाठ्या-काठ्या खाण्याची आमची तयारी आहे, अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली होती. दरम्यान, आता या तीव्र विरोधानंतर अजित पवार यांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे.