Rohit Pawar : पुन्हा येण्याच्या मोहापायी…’बॉम्बे डायमंड बुर्स’ स्थलांतरावरून सुळेंनंतर रोहित पवारांचंही टीकास्त्र

Rohit Pawar : पुन्हा येण्याच्या मोहापायी…’बॉम्बे डायमंड बुर्स’ स्थलांतरावरून सुळेंनंतर रोहित पवारांचंही टीकास्त्र

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल? अशाप्रकारे तडजोड करून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही.

Ashok Gehlot : ‘देशात कुत्र्यांपेक्षा जास्त ‘ईडी’चा वावर’; गेहलोतांचे वादग्रस्त वक्तव्य

पुन्हा येण्याच्या मोहापायी…

मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरून टीका करताना रोहित पवार यांनी एक ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले रोहित पावर पाहूयात…

Vijay Vadettiwar : पुन्हा येऊ शकतं नाही, हे माहिती असल्याने ट्विट डिलिट; वडेट्टीवारांचा टोला

‘एका मोठ्या हिरे व्यावसायिकाने आपला १८००० कोटीची उलाढाल असलेला ‘बॉम्बे डायमंड बुर्स’मधील व्यवसाय सुरत डायमंड बुर्समध्ये स्थलांतरीत केल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला पळवण्याचा घाट घातला जात असल्याचा मुद्दा गेल्या अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून देत संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता, परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने लक्ष न घातल्याने ज्या गोष्टीची भीती होती तीच आज सत्यात उतरताना दिसतेय.’

‘सुरत डायमंड बुर्सचा व्यवसाय वाढावा म्हणून बॉम्बे डायमंड बुर्सचा बळी दिला जात आहे, मुंबईच्या व्यावसायिकांना वेगवेगळ्या माध्यमातून धमकावून मुंबईतला व्यवसाय बंद करून सुरतमध्ये व्यवसाय सुरु करण्यास भाग पाडले जात आहे. आज केवळ 17000 कोटीचा हिऱ्यांचा व्यवसाय गेला आहे, अजून दीड लाख कोटींचा हिरे व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरीत होणार आहे. लाखो कोटींची उलाढाल असलेला बॉम्बे डायमंड बुर्स डोळ्यादेखत संपवून आपल्या हक्काचे रोजगार पळवले जात असतील तर आपण शांत बसायचे का?

पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल? अशाप्रकारे तडजोड करून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही. ‘पुन्हा येण्यापेक्षा महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी किंवा महाराष्ट्राचे वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणे हेच आज महाराष्ट्राला अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राचे युवा हे करतीलच’, हे पुन्हा येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यावं ! अशी टीका पवार यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube