.. म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात; अजितदादांच्या आमदाराने सांगितलं खरं पॉलिटिक्स

.. म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात; अजितदादांच्या आमदाराने सांगितलं खरं पॉलिटिक्स

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) मोठा गट घेऊन अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही आमदारांना वजनदार खाती मिळाली. आता तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजितदादांनाच देण्यात आले. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. दोन्ही गटातील वाद वाढले आहेत. अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगितला आहे. या घडामोडी घडत असतानाच अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सुप्रिया सुळे यांच्या एका जुन्या भाषणाचा उल्लेख करत खोचक टीका केली आहे.

अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) पाठिशी आहे त्यामुळे त्या मागील अनेक वर्षांपासून लोकसभेत निवडून येत आहेत, असे मिटकरी म्हणाले. अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

Maharashtra Politics : कोर्टाच्या दणक्यानंतर सरकार ताळ्यावर; मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली

मिटकरी म्हणाले, खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण ऐकलं. त्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या की फार कमी बहिणी अशा आहेत ज्यांच्या पाठिशी भाऊ उभा राहतो. मी त्यांच्या मताचं शंभर टक्के समर्थन करतो. कारण, बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आहे, म्हणून सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून लोकसभेत निवडून येतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube