Download App

हंगामाच्या नमनालाच बियाण्यासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची पाळी, अजित – १५५ बीटी बियाण्याचा तुटवडा; साठेबाजी की टंचाई?

  • Written By: Last Updated:

अकोला : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. तथापि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अजित – १५५ (Ajith – 155) या नामांकित बियाण्याचा बाजारात तुटवडा असून, या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे. (Ajit – Shortage of 155 Bt cotton seeds!)

दरम्यान, सर्वसाधारण शेतकरी अर्थात ९० टक्के शेतकरी बियाणे बाजारात शिरले नाही. दरम्यान, मान्सूनचा पाऊस पडण्यापूर्वीच या बियाण्याचा तटवडा भासत असेल तर ही बाब कत्रिम टंचाई अधोरेखित करते. लागवडीला प्रत्यक्षात सुरूवात झाल्यानंतर या बियाण्यासाठी दाम दु्प्पट दर मोजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप २०२३ या हंगामाकरिता कृषी विभागाने जिल्हयातील १ लाख ६० हजार हेक्टरवर कापस लागवड प्रस्तावित केली आहे. यासाठी विविध बीटी कपाशी बियाणे निर्मात्या कंपन्यांकडून ८ लाख पॉकिटाचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत या कंपन्यांकडून ६ लाख पॉकिटे उपलब्ध झाले. पैकी अजित १५५ व याच कंपनीच्या अन्य बियाण्यांचे २ लाख २३ हजार ७०७ पॉकिटे बाजारात पोहोचले असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

फडणवीस अजूनदेखील विसरले नाही, भर सभेत स्वतःचा केला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख 

अजित – १५५ हे बियाणे विशेषतः कोरडवाहूकरिता शेतकरी वापरतात. याला शेतकऱ्यांची प्रथम पसंती आहे. दरम्यान, अद्याप कोरडवाहू क्षेत्रात लागवडीचा मुहूर्तच निघाला नाही. तर मग जवळपास सव्वा दोन लाख पॉकिटे गेली कठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बियाण्याची साठेबाजी तर होत नाही ना, लागवडीला सुरुवात होण्यापूर्वी ही कृत्रिम टंचाई तर निर्माण केली जात नाही ना, अडवणूक तर केली जात नाही ना ? अशा शंका शेतकऱ्यांतन घेतल्या जात आहेत.

शेतकऱ्यांची भटकंती
मान्सूनचा पाऊस पडत नसला तरी शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पाऊस पडण्यापूर्वी पसंतीच्या बियाण्यांच्या खरेदीकडे वळले आहे. परंतु, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीचे अजित – १५५ हे बीटी कपाशी बियाणे बाजारात मिळत नसून, शेतकरी यासाठी पायपीट करीत आहेत. हे बियाणेच उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्रांकडून सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अजित -१५५ या बीटी कपाशी बियाण्याच्या तुटवड्याबाबत अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने जिल्हा कृषी अधीक्षक यांना पत्राव्दारे अवगत केले आहे. अजित कंपनीच्या १५५ सह अन्य वाणाच्या बियाण्याची सुमारे साडेतीन लाख पॉकिटांची मागणी असते. आतापर्यंत या बियाण्याच्या दोन लाख पॉकीटची पूर्तता करण्यात आली आहे. यामध्ये अजित-१५५ या बियाण्याची एक लाख पॉकिटांची पूर्तता करण्यात आली. अजित – १५५ या बियाण्याची मागणी पाहता या वाणाची टंचाई भासत आहे. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरू शकतो. त्यामुळे कंपनीच्या संपर्कात राहून या बियाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी पत्रातून केली आहे.

एकाच वाणाचा आग्रह धरू नये
जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष मोहन सोनावने यांनी सांगितले की, प्रत्येक बियाणे तपासणी होऊनच बाजारात येतात. त्यामुळे सर्वच बियाणे लागवडीयोग्य असते. त्यामुळे एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता त्या बियाण्याच्या तोडीसतोड बियाणे खरेदी करावे. सर्वच बियाणे निर्माते कंपन्या आपले बियाणे सकस कसे राहील, यावर भर देत असतात. एकाच बियाण्याचा आग्रह धरल्यास काही कृषी सेवा केंद्राकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाऊ शकते.

Tags

follow us