फडणवीस अजूनदेखील विसरले नाही, भर सभेत स्वतःचा केला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

  • Written By: Published:
फडणवीस अजूनदेखील विसरले नाही, भर सभेत स्वतःचा केला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी ते स्वतःला अजूनदेखील मुख्यमंत्री समजतात. आज धाराशिव येथे मोदी@९ निमित्त विशाल जाहीर सभा झाली या सभेत बोलताना फडणवीसांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. नंतर सारवासारव करत उपमुख्यमंत्री असा केला. (Fadnavis still did not forget, referred to himself as Chief Minister in the plenary session)

झालं असं कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथे मोदी@९ निमित्त जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले मला आज अतिशय आनंद आहे मी मुख्यमंत्री@@ उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यादा धाराशिवला येतोय, पण त्याही पेक्षा हा आनंद आहे कि उस्मानाबादचे धाराशिव झाल्यानंतर मी पहिल्यांदा याठिकाणी येतोय.

पुढे बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका आहे.

‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ

भाजपने कर्नाटकचा हा मुद्दा मोठा बनवला आहे. महाराष्ट्रातील भाजपने देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे की ते आता का बोलत नाहीत? पुस्तकातून एखाद्याचे नाव काढता येते, पण हृदयातून काढता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे नाव तुम्ही पुसून टाकू शकत नाही, पण काँग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना आता काय म्हणायचे आहे? वीर सावरकरांचा हा अपमान तुम्ही (उद्धव ठाकरे) मान्य कराल का? फक्त खुर्चीपुरतेच सेटलमेंट करणार का? असा सवाल करत टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतल्या जात आहे. मोदीजींनी खूप गोष्टी या देशात केल्या. आज आपण शांत बसून शकतो कारण कोरोना काळात मोदींनी दोन वेळा मोफत लस टोचली. म्हणून आपण सर्व आज उपस्थित आहोत. साडेसतरा कोटी मोफत लसी देण्याचे काम मोदींनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube