Ambadas Danve On State Gov : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, कांदा, मका, ज्वारी, यासह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पशु हानी आणि मनुष्य हानी देखील झाली आहे, मात्र सरकारकडून केवळ घोषणा केली आणि मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे राज्यसरकार मूकं, बहिरं, आणि आंधळं आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
अंबादास दानवे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बोरीअडगाव, चितोडा, पळशी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन नुकसान ग्रस्त पिकाची पाहणी केली असताना बोलत होते, यावेळी पळशी येथील शेतकऱ्यांच्या वीज पडल्याने बकऱ्या ठार झाल्या होत्या त्या शेतकऱ्याचे ही सांत्वन अंबादास दानवे यांनी केले.
दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज या अवकाळी पावसाचा फटका पुणे (Rain in Pune) शहरालाही बसला. पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन तापमानात घट झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्याने जाणारे नागरिक आणि वाहनचालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
Old Mumbai-Pune Highway Accident : दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; साखर झोपेतच मृत्यूने कवटाळले
राज्यात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याला या पावासाने झोडपून अन्य जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडला. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले तर शेतात गारांचा खच पडला होता. हजारो रुपये खर्च करून वाढवलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाली. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा, गहू, हरभरा अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.