Old Mumbai-Pune Highway Accident : दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; साखर झोपेतच मृत्यूने कवटाळले

Old Mumbai-Pune Highway Accident :  दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; साखर झोपेतच मृत्यूने कवटाळले

Old Mumbai- Pune Highway Accident :  काल दिवसभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या दिमाखात पार पडला. या उत्सवात ढोल वाजवण्यासाठी एक पथक मुंबईहून पुण्याला आले होते.  पण घरी परतत असताना  मध्यरात्री काही त्यांच्यावर काळाने घाला घातला. जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) ही खाजगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात (accident) झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये सहा वर्षांच्या मुलापासून ते 25 वर्षांच्या तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही सर्व जण मुंबईहून पुण्याला ढोलताशा पथक सादर करण्यासाठी आले होते. परत रात्री घरी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

Photo’s : सौंदर्यात भारतीय अभिनेत्रींनाही मागे टाकेल अशी आहे हॅरी ब्रूकची GirlFriend

या अपघातात एकाच कुटूंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. स्वप्नील श्रीधर धुमाळ वय 16 वर्षे व सतिश श्रीधर धुमाळ वय 25 वर्षे अशी त्यांची नावे असून या दोघा भावांच्या  मृत्यूने  सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणावळ्याजवळील बोरघाटात पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ही सर्व मुले साखर झोपत असतानाच त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.

यातील प्रत्येक मुलगा हा आपल्या कुटूंबाला मदत करता यावी म्हणून ढोल-ताशा वाजवण्याचे काम करायचा. काहींच्या खांद्यावर कुटूंबाची जबाबदारी होती. तर काही मुले आपल्या शिक्षणाचा खर्च या कामातून भागवत होते. पण त्यांच्या या मेहनतीवर काळाने पाणी फिरवले आहे. त्यांच्या मृत्यूने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. घरातील तरुण मुले गेल्याने त्यांचे आई-वडील हताश झाले आहेत. मृत झालेली सगळेच जण हे 30 वर्षाच्या आतील होती. त्यामुळे या सर्व जणांच्या मृत्यूने प्रत्येकाला धक्का बसला आहे.

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube