सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा, पराभवानंतर रवी राणांची प्रतिक्रिया

Amravati Market Committee Election : अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. हनुमान चालीसाचा गैरवापर केला त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती. ठाकूर यांच्या या टीकेवर आता आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये मिळालेल्या […]

Untitled Design   2023 04 29T181719.157

Untitled Design 2023 04 29T181719.157

Amravati Market Committee Election : अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. हनुमान चालीसाचा गैरवापर केला त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती. ठाकूर यांच्या या टीकेवर आता आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये मिळालेल्या सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा असे राणा म्हणाले आहे. निवडणुकीतील पराभवानंतर रवी राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावर पुढे बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान जी आमच्या हृदयात आहे. हनुमान चालीसा म्हटलं म्हणून मला महाविकास आघाडी सरकारने जेलमध्ये टाकलं होतं. हनुमान जी माझे दैवत आहे. मी ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी मला जेलमध्ये टाकलं.

वेब सिरीजची बोल्ड अभिनेत्री आयुषी जैस्वाल

आता बाजार समितीमध्ये यशोमती ठाकूर यांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा वापर शेतकरी हितासाठी करावा व शेतकरी हिताची निर्णय घ्यावे. तसेच सहकार क्षेत्रात माझी पहिली एन्ट्री होती मला याचा अनुभव नव्हता अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

वडील आजारी अन् आदित्य मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, राणेंचा दावा

आज अनेक कृषी बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यातच अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 जागा विजयी झाल्या आहेत. यावेळी आमदार रवी राणा व भाजपच्या पॅनलचा यशोमती ठाकूर गटाने दारुण पराभव केला. यावेळी विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः रस्त्यावर येत मोठा जल्लोष केला.

Exit mobile version