Sanjay Raut On Anand Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आले असून, विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनात निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं असून, या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे.
याचिका नेमकी कशासाठी केली होती तेच ईडीला आठवेना! छगन भुजबळांना मोठा दिलासा
राजीनाम्याची बाब आठदिवस गुलदस्त्यात
मागासवर्ग आयोगातील अध्यक्षांपासून ते सदस्यांपर्यंत ज्या प्रकारे राजीनामा सत्र सुरू आहे. ते बघता या सर्व प्रकरणात नक्की काहीतरी गडबड असल्याचे म्हणत निरगुडे यांनी राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बाब सरकारने आठ दिवस गुलदसत्यात ठेवल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. ही लपवाछपवी लक्षात घेता नेमकं काय सुरू आहे हे बारकाईने पाहणे महत्त्वाचे आहे. आयोगावर कुठल्या प्रकारचा अहवाल द्यावा, यासाठी दबाव असल्याची बाब मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे हे मात्र या सर्वातून अधोरेखित होत असल्याचे राऊत म्हणाले.
सध्याचे सरकार बदनामी करण्याचा कारखाना
आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपले राजकीय पोळी भाजायचे असे मनसुभे सध्याच्या सरकारचे असून, सध्याचे सरकार बदनामी करण्याचा कारखाना आहे. आम्ही त्यांना भीक घालत नाही. कोणत्याही प्रकरणात एसआयटी स्थापन करून चौकशी करा, लाखो लोक शिवसेनेत आहेत प्रत्येकाच्या मागे एसआयटी लावा यामुळे काहीही फरक पडणार नाही.
मोदी, शिंदे, फडणवीस आणि पवार तात्पुरती व्यवस्था
प्रधानमंत्री मोदींवर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूंवर अमित शहांनी टीका केली.या देशात लोकशाही, संविधान आहे, सेन्सरशिप लावलेली नसून, मोदींविषयी आमच्या मनात नेहमीच आदर आहे. जर एखादी व्यक्ती राजकीय भूमिका घेतो तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही तात्पुरती व्यवस्था असून, लवकरच सरकार बदलणार असल्याचा दावा राऊतांनी केला.