Download App

फडणवीसांनंतर अमित शाहंचा शब्द! म्हणाले, राज्यपाल करणार; अडसुळांचा खुलासा

अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.

Anandrao Adsul : अमरावती लोकसभेबाबत राज्यात मोठी चर्चा झाली. येथे महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची मोठी चर्चा रंगली होती. शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. परंतु, भाजपने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अडसूळ यांचा विरोध मावळला. दरम्यान, आता अडसूळ यांनी नवीनच दावा केला आहे.

नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब बच्चू कडू कोणत्या भिडू ला संसदेत पाठवणार?

राज्यपाल पदाची ऑफर

ज्यावेळी उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती त्या काळात आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. त्यांनी त्यावेळी मला अमरावतीतून निवडणूक लढवू नये असं सांगितलं. त्यावेळी आपण येथे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत ते निवडून येऊ शकत नाहीत असं आपण कळवलं. परंतु, ते आम्ही पाहू आपण काळजी करू नका. आपल्याला राज्यपाल केलं जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं असा मोठा खुलासा आडसूळ यांनी यावेळी केला आहे.

 

फडणवीसांनीही दिलं आश्वासन

निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु, अमित शाहंच्या ऑफरनंतर आपण माघार घेतली. मात्र, गेली 20 महिन्यांपासून उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच आश्वासन देत आहेत अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली. त्यामुळे अडसूळ यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यास सांगून भाजपने त्यांना राज्यपाल करण्याच ठरवलं आहे असं समोर आलं आहे.

 

यावेळी तिकीट कापलं

आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभेचे 2009 आणि 2014 साली खासदार होते. पुढे, 2019 ला येथे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नवनीत राणा यांच्याकडून अडसूळ यांचा पराभव झाला. त्यानंतर नवनीत राणा भाजपात गेल्या आणि अडसूळ यांची उमेदवारीच रद्द झाली अशी यावेळीची अमरावती लोकसभेतील परिस्थिती होती. दरम्यान, आता या विषयात अडसूळ यांनी नवा दावा केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

follow us