Anil Bonde on Yashomati Thakur : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसमधील (Congress) वाद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना रावणाशी केली होती. भाजपने राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यात राहुल गांधींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले होते. या; मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भारतीय जनता पक्ष आणि नथुराम गोडसेचा डीएनए एकच आहे, अशी टीका केली होती. ठाकूर यांच्या टीकेला खासदार अनिल बोडेंनी (Anil Bonde) जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘आत्मपॅम्फ्लेट’ला थिएटर्स मिळेना, दिग्दर्शक आशिष बेंडेंची भावनिक पोस्ट
आज माध्यमांशी बोलतांना बोंडे यांनी यशोतमी ठाकूर यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, आमचा डीएनए तपासण्याच्या आधी एकदा तुम्ही स्वतःचा डीएनए तपासला पाहिजे. त्यांचा डीएनए फिरोज खानचा आहे, की इटलीचा आहे? हे तपासून घेणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा भारताचा आहे. त्यांचा डीएनए महात्मा गांधीचा नाहीच. त्यांचं नाव फिरोज जहागीर गंदी होतं, गांधी नव्हतं. त्यामुळे महात्मा गांधींचा डीएनए हा काँग्रेसचा नाही आणि आताच्या काँग्रेसचा तर बिलकुलच नाही, असं बोंडे म्हणाले.
आम्हाला कॉंग्रेस आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही, तितका त्रास भाजपचा होतो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली होती. कितीही जोर लावा, पण तुम्ही मला निवडणूकीत पाडू शकत नाही, असं ते म्हणाले. यावरही बोंडे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, बच्चू कडूंना जर भाजपकडून त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडायचं आहे. आम्ही आमच्या पक्षाचे आदेश पाळतो आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतो. दुर्दैवं हे आहे की, काही लोकांना स्वतःबद्दल अहंकार आणि गर्व निर्माण आहे. पण, गर्व जास्त निर्माण झाला आणि लोकांना गृहीत धरलं तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. लोकशाहीत कोणताच पक्ष कोणाला पाडू शकत नाही, जनताच पाडत असते, त्यामुळं बोलणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असं बोंडे म्हणाले.
दरम्यान, ओबीसी गौरव यात्रा अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे 9 ऑक्टोबर ला दुपारी तीन वाजता येणार आहे. केंद्र सरकारने ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा दिला आहे. यासह देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालय बनविले आहे, स्पेशल बजेट देखील दिले आहे, असं बोंडे म्हणाले.