Download App

आमच्याशिवाय मुख्यमंत्री होऊ शकत नाही; बच्चूंनाच पराभवाचा ‘कडू’ डोस

बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.

  • Written By: Last Updated:

Achalpur Vidhan Sabha Election Result 2024 : परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना (Bachchu Kadu) मोठा धक्का बसला. बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात (Achalpur constituency) 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. तर भाजपचे प्रवीण तायडे (Praveen Tayde) यांना 68 हजार 685 इतकी मते मिळाली आहेत.

अचलपूर हा बच्चू कडूंचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून बच्चू कडू सातत्याने निवडून येत आहेत. यंदा बच्चू कडू विरुद्ध काँग्रेसचे बबलूभाऊ देशमुख आणि भाजपचे प्रवीण तायडे यांच्यात तिरंगी लढत झाली. यंदाही बच्च कडू हेविजयाची हॅट्ट्रिक साधतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

लोकसभेला नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवार दिली होता. त्यामुळं विधानसभे बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपने प्रवीण तायडे या नवख्या उमेदवाराला उभे केले होते. त्याचाच फटका कडू यांना बसल्याचं बोलल्या जातं.

follow us