Download App

राज्यातील दंगलीवरुन बच्चू कडूंचा संताप, ‘…तर त्यांचे हात छाटले पाहिजे’

Bachu Kadu on Hindu-Muslim violence : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमहमदनगर येथे दोन गटात हिंसाचार घडला आहे. या दंगलीमध्ये काहीजणांचा जीवही गेला आहे. अलीकडेच अकोला येथे झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलिसांसह अन्य आठ लोकही जखमी झाले आहेत.

अकोला दंगलप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर अरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावरुन आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. दंगल घडवण्यासाठी जे पुढं आले असतील त्यांचे हात छाटले पाहिजे असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेल्या दंगलीप्रकरणी विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, दंगल करणारा कुणीही असो.. मग तो हिंदू असो वा मुस्लीम असो किंवा इतर कुठल्याही जातीचा असो.. जे जे दंगल पेटवण्यासाठी पुढं आले असतील, त्याचे हात छाटले पाहिजे. दंगलीच्या माध्यमातून शहरात अशांतता निर्माण करुन विकासाला बाधा आणण्याचा काम केलं जातं आहे.

Pune Crime News : बाबाराजे देशमुख अटकेत; 70 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. दररोज कुणी ना कुणी आत्महत्या करत आहे. औषधं मिळत नाही, म्हणून लोक मरतायत. असं असताना एकमेकांच्या विरोधात कुणी तलवारी काढत असेल आणि शहरातील शांतसा भंग करत असेल तर हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. त्यांच्या विरोधात कारवाई होणं फार महत्वाचं आहे. मग कोणत्याही धर्माचा असला तरी कारवाई झालीच पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Tags

follow us