बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; फक्त तीन दिवसांत पडतंय टक्कल

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत एका अजब आजारानं चांगलंच थैमान घातलं आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणं थोडं कठीण होईल पण हे खरं आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसांत डोक्यावर टक्कल होते. साधारणतः शाम्पू जास्त प्रमाणात वापरल्याने केस गळतात असे मानले जाते. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शाम्पू […]

Buldhana News

Buldhana News

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत एका अजब आजारानं चांगलंच थैमान घातलं आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणं थोडं कठीण होईल पण हे खरं आहे. लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसांत डोक्यावर टक्कल होते. साधारणतः शाम्पू जास्त प्रमाणात वापरल्याने केस गळतात असे मानले जाते. पण ज्यांनी आयुष्यात कधीच शाम्पू वापरला नाही त्यांचेही केस अचानक गळू लागल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बोंडगाव, हिंगणा, कालवड या तीन गावात या आजाराचा प्रादु्र्भाव दिसून येत आहे. फक्त पुरुषच नाही तर महिलांमध्ये देखील या आजाराचा फैलाव दिसून येत आहे.

राज्यात आज दिवसभर मुसळधार! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक या गावांमध्ये दाखल झाले आहे. याठिकाणी तत्काळ सर्वेक्षाचणाचे आदेश देण्यात आले आहेत. शेगाव तालुक्यात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. या तालुक्यातील तीन गावांतील जवळपास 50 लोकांना अचानक केसगळतीची समस्या जाणवू लागली आहे. डोक्याला खाज सुटून अचानक टक्कल पडत असल्याने सारेच भयभीत आहेत. हा आजार नेमका आहे तरी काय याची काहीच माहिती अजून तरी मिळालेली नाही.

फक्त तीनच दिवसांत टक्कल पडत असल्याचे गावातील नागरिक सांगत आहेत. अनेकांनी खासगी दवाखान्यांत गर्दी केली आहे. परंतु, या आजाराबाबत ठोस माहिती अजून तरी मिळालेली नाहीत.

या आजाराच्या लक्षणांचा विचार केला तर सर्वात आधी डोक्याला खाज सुटते. नंतर केस गळू लागतात. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडते. त्यामुळे नागरिकांत भीती पसरली आहे. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या समस्येची तत्काळ दखल घेण्यात यावी. गावागावात उपचार शिबीरे आयोजित करावीत अशी मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर आता आरोग्य विभागाकडून काय कार्यवाही केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२४ ते २५ जानेवारीला अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे आयोजन, मुरलीधर मोहोळांच्या हस्ते लोगोचे अनावरण

Exit mobile version