२४ ते २५ जानेवारीला अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे आयोजन, मुरलीधर मोहोळांच्या हस्ते लोगोचे अनावरण
बालेवाडी : विविध सामाजिक उपक्रमातून सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजप युवा नेते ‘लहू बालवडकर‘ (Lahu Balwadkar) यांच्या वाढदिवासानिमित्ताने बालेवाडीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, (Muralidhar Mohol) तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही उपस्थित राहून लहू बालवडकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी २४ ते २५ जानेवारी रोजी होणाऱ्या अटल सेवा महाआरोग्य शिबीराच्या लोगोचेही अनावरण ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या हस्ते करण्यात आले.
लहू बालवडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये राहून विविध सामाजिक तसेच राजकीय उपक्रम राबवत आले आहेत. मागच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने ‘भव्य भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या भजन स्पर्धेला जवळपास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच मोठ्या संख्येने पुणेकरांनी ही भव्य दिव्य स्पर्धा याची देही याची डोळा अनुभवली होती. मात्र यंदा त्यांनी ‘अटल सेवा महाआरोग्य शिबीर’ आयोजित केले आहे.
कोपरगावकरांचे प्रश्न सुटणार! उद्या आमदार आशुतोष काळेंचा जनता दरबार
आज बालेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय येथे केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी भेट देत लहू बालवडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना मिल्क चॉकलेटही दिले. याचसोबत बालेवाडी येथे येत्या २४ व २५ जानेवारीला लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने अटल सेवा महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबीराच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले.
दरम्यान, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अटल सेवा महाआरोग्य शिबीरामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतील नामांकित तसेच धर्मदाय, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाचा सहभाग असणार आहे. या शिबिरात शस्र्क्रिया न करता व कुठलेही इम्प्लांट न वापरता गुडगा प्रत्यारोपण, सांधेदूखी, खुबा प्रत्यारोपण, अशा वेदनादायक आजारांवरती नवीन आयुर्वेदिक उपचार प्रणालीने उपचार केले जाणार आहेत.