BJP पदाधिकाऱ्याची फडणवीसांच्या नागपुरातच हत्या; नेमकं काय घडलं?

BJP : भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याचं नागपूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याचं नाव राजू डेंगरे असं आहे. तो पाचगाव येथे ढाबा चालवत होता. Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ […]

Rajasthan BJP Candidate List:

Rajasthan BJP Candidate List:

BJP : भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याचं नागपूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याचं नाव राजू डेंगरे असं आहे. तो पाचगाव येथे ढाबा चालवत होता.

Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

याच ढाब्यावर त्याची रात्री तीनच्या सुमारास त्याचा त्याच्याच ढब्यावरील कर्मचाऱ्यांसह वाद झाले. याच वादातून त्यांनी राजू डेंगरे यांच्यावर काठ्या आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. हा वाद किरकोळ असला तरी या हत्येमागील कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग : शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून तपासणी

ही हत्या केल्यानंतर हे आरोपी तेथून फरार झालेले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तर राजू यांची हत्या केल्यानंतर या आरोपींनी त्यांच्या ढाब्याच्या काऊंटरमधील पैसे आणि त्यांची कार देखील लंपास केली आहे. मात्र पुढे या कारचा अपघात झाल्याने त्यांनी ही कार रस्त्यात तशीच सोडून दिलेली देखील आढळली आहे. राजू यांच्या हत्येनंतर भाजप कार्यकर्त्यांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

Exit mobile version