Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

सिकंदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत त्यांच्यासमोर एका तरुणीने उंच खांबावर चढून निदर्शने केली. यामुळे अधिकाऱ्यांसह पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आपली मागणी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तिने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. अखेर मोदी यांच्याच विनंतीनंतर संबंधित तरुणी खाली उतरली. (Rally of Prime Minister Narendra Modi, a young woman climbed a tall pole and protested in front of him)

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (11 नोव्हेंबर) सिकंदराबाद येथे सभा पार पडली. याच सभेत सभा चालू होण्यापूर्वी एक मुलगी लाइट-साऊंडसाठी बांधलेल्या खांबावर चढली. मोदी यांनी मुलीला टॉवरवर चढताना पाहिले तेव्हा त्यांनी तिला खाली उतरण्याचे आवाहन केले.

“मुली, खाली उतर, ती वायर खराब झाली आहे, बघ खाली ये, ती वायर बरोबर नाही, मी इथे फक्त तुमच्यासाठी आलो आहे, मी तुमच्या जवळ आहे, खाली ये”, असं म्हणत मोदी सतत संबंधित तरुणीला खाली येण्याचे आवाहन करत होते, पण मुलगी खांबावरून खाली उतरत नव्हती. अखेर मोदी यांच्याच विनंतीनंतर संबंधित तरुणी खाली उतरली.

भारतीयांनी मुहूर्त साधला! धनत्रयोदशीला 42 टन सोन्याची खरेदी; 30 हजार कोटींची उलाढाल

पंतप्रधान सभेत काय म्हणाले?

तेलंगणातील सत्ताधारी केसीआर सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी येथे स्थापन झालेले सरकार तेलंगणाच्या स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे रक्षण करू शकले नाही. तेलंगणातील लोकांच्या क्षमतेचे जगाने कौतुक केले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने जनतेची निराशा केली आहे. आंदोलनाच्या वेळी दलिताला तेलंगणाचा पहिला मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन लोकांना दिले होते. मात्र, राज्याच्या स्थापनेनंतर केसीआर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा केला.

काँग्रेसवरही निशाणा :

बीआरएस दलितविरोधी आहे आणि काँग्रेसही त्यांच्यासारखीच आहे. नवीन संविधानाची मागणी करून बीआरएसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. काँग्रेसने बाबासाहेबांना दोनदा निवडणूक जिंकू दिली नाही. बीआरएसप्रमाणेच काँग्रेसचाही दलित आणि मागासलेल्या लोकांबद्दल द्वेषाचा इतिहास आहे. भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले तेव्हा काँग्रेसने त्यांची सर्व शक्ती वापरून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला.

Indian Railway : रेल्वे पकडताना चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू; अनेक बेशुद्ध

पुढे कोविंद राष्ट्रपती झाल्यावरही काँग्रेसने त्यांचा तिरस्कार केला.जेव्हा भाजपने एका महिलेला भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा काँग्रेसने श्रीमती द्रौपदी मुर्मूजींनाही विरोध केला. दलित सरकारी अधिकारी हिरालाल समरिया यांना मुख्य माहिती आयुक्त बनवल्यावर काँग्रेसनेही त्यांच्या शपथविधीला विरोध केला. एवढ्या मोठ्या सरकारी पदावर दलित अधिकाऱ्याला बसावे असे काँग्रेसला नको होते, असा मोठा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube