ब्रेकिंग : शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून तपासणी

ब्रेकिंग : शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून तपासणी

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत पवार यांना त्रास जाणवू लागल्याने जागेवरच डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Sharad Pawar was examined by a doctor as he suddenly felt unwell)

Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय बारामतीमध्ये उपस्थित आहे. याचवेळी आज विद्या प्रतिष्ठानची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र उपस्थित डॉक्टरांनी तातडीने तपासणी करत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सततच्या धावपळीमुळे त्यांना हा त्रास जाणवला आहे. पवार दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होते. त्यानंतर काल (10 नोव्हेंबर) पुण्यात होते. तर आज बारामती उपस्थित आहेत.

निलंबित पोलिस अधिकाऱ्यासाठी सावंतांची थेट पोलिस अधीक्षकांना दमदाटी; व्हिडीओ व्हायरल

बारामतीत अजित पवार, सुप्रिया सुळे एका मंचावर!
डेंगीच्या आजारातून बरे झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आज बारामतीत होते. येथे दिवाळीनिमित्त शारदोत्सव या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाला आस्वाद अजित पवार यांनी घेतला. या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज