Download App

उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा खोटारडा माणूस महाराष्ट्रात नाही; नितेश राणेंची जहरी टीका

Nitesh Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंक्षा मोठा खोटारटा माणूस महाराष्ट्रात नाही, अशी जहरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला’, नितेश राणेंनी राऊतांना झापले

नितेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात तुलना केल्यास उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा खोटारटा माणूस महाराष्ट्रात नाही. अमित शाह यांची मोठी विश्वासार्हता आहे. शाह नेहमीच दिलेला शब्द पाळतात. संजय राऊत काहीही खोटं बोलत आहे. त्या ठिकाणी राऊत होता का? असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊतांना उद्देशून केला आहे.

तसेच मातोश्रीवरील चर्चेबाबत अमित शाह यांनी असा कोणताही शब्द दिलेला नव्हता. संजय राऊत असा दावा करत असेल तर हा तिथे होता का? उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखं बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. संजय राऊतच्या शब्दाला महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरात तरी मान आहे का? असाही उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

Supriya Sule : माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर कुठेही बसून चर्चा करेल; सुप्रिया सुळेंचं आव्हान

अकोला जिल्ह्यात टिपू सुलतान उदात्तीकरण आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचा बसवण्यासाठी विरोध या सगळ्या विरुद्ध हिंदू समाजाच्या मनात अस्वस्थता आहे. हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून मोर्चा काढत आहे, त्यात सहभागी होणार असल्याचंही नितेश राणेंनी यावेळी सांगितलं आहे.

धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही…
मुस्लिम धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही,. मुस्लिम समाजातील जातींचा अभ्यास करुन आरक्षण मागितलं तर ते शक्य आहे. मुस्लिम धर्माच्या आधारावर आरक्षण मागू नका कोणाचं लागूळचाळण करण्यासाठी अशी मागणी करु नका, मुस्लिम धर्मावर आरक्षण मिळू शकत याबाबत देवेंद्र फडणवीसांनीही भूमिका स्पष्ट केली असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, संपूर्ण देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. काँग्रेसमधील नेत्यांना आता समजलेलं आहे. राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानचा माल संपलेलला आहे. ते नफ्याचे दुकान राहिलेले नाही. त्यामुळे न्याय यात्रेत लोकं आता शिल्लक राहिलेली नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांना आपले भविष्य मोदींच्या गॅरंटीमध्ये दिसत असल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

follow us