Download App

Breaking : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Bus Accident News: : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन पेट घेतल्याने बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसमध्ये ड्रायव्हसह 33 जण होते. यातील एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आग एवढी भयंकर होती की फक्त बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे.

फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

नागपूरवरुन खासगी प्रवाशी बस ही पुण्याला निघाली होती. सिंदखेडराजा जवळ बस डिव्हायडरला धडकून टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. बस उलटून ती रस्त्यावर घासल्याने तीने पेट घेतला. बघता बघता संपूर्ण बसने चांगलाच पेट घेतला. मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्यातच अचानक या सर्व गोष्टी घडल्याने प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. अन् त्यामुळे मोठी जीवितहानी झाली.

देवदर्शनावरून परतत असलेल्या भाविकांवर काळाची झडप; ६ ठार

पहाटे पाचच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी पाच ते सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. संपूर्ण बस जळून खाक झाल्याने बसमधील प्रवासी पू्र्णपणे जळाले आहेत. त्यामुळे आता मृतांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सची बस नागपूरवरुन पुण्याकडे निघाली होती. 30 जूनला नागपूरवरुन सायंकाळी 5 वाजता ही बस पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर ही बस डिव्हायडरला धडकल्याने टायर फुटले. टायर फुटल्यानंतर ही बस उलटली. त्यानंतर काही मिनिटांतच बसने पेट घेतला. त्यांनतर गाडीचा मोठा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags

follow us