Download App

शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील

  • Written By: Last Updated:

अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्या लक्षात घेता आजच्या अमरावती दौऱ्यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, आपण जिल्हाधिकाऱ्यांना काही होत नाही आणि जे होणार आहे ते काही चुकत नसल्याचे सांगितले. आज आपण अनेक सर्वसामान्यांनाही भेटल्याचे यावेळी पाटील यांनी यावेळी सांगितले. (Chandrakant Patil On Ink Thrown Incident)

चंद्रकांतदादांना अमरावती भावलं; अजितदादांची स्टाईल करणार फॉलो

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी नेहमी कशासाठीही तयार असतो. दोनवेळा माझ्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या. माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात. मागच्या दोन्ही शाईफेकीच्या घटनांवेळी मी शर्ट बदलून तिसऱ्या मिनिटाला कामाला लागलो होतो. सोलापूरमधील घटनेनंतर मी पाचशे निवेदने स्वीकारल्याचेही पाटील म्हणाले. तसेच तेथील गर्दीचा फायदा घेऊनन संबंधिथ व्यक्तीने शाईफेकल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर मध्यंतरी शाई फेकण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर त्यांच्या दौऱ्यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवला जातो. आजच्या त्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यानही जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उपायोजना केल्या होत्या. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीला नेहमी तयार असल्याचे सांगत आजही अनेक सर्व सामान्यांना भेटत त्यांची निवेदन स्वीकारल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

‘मविआ’चं पाप आमच्या माथी नको, उबाठा सरकारचे कंत्राटी भरतीचे ‘जीआर’ रद्द; फडणवीसांची मोठी घोषणा

म्हणून पुण्यातील बैठकीला नव्हतो

दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अजितदादांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीला चंद्रकांतदादांनी दांडी मारली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, माझा दौरा पूर्वनियोजित असल्याने मी पुण्यातील बैठकीला अनुपस्थित राहिलो. मात्र अजित पवारांनी तातडीची बैठक घेण्याचं कारण शेतकऱ्यांकडून पाण्याची डिमांड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन लिंक करण्याचा प्रयत्न केला. पण ऑनलाईन लिंक होत नव्हतं. मात्र दुपारच्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित राहिल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us