Download App

चंद्रपुरात शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान राडा; संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध

चंद्रपूरमध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या बैठकीदरम्यान चांगलाच राडा झाला. या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याचे दिसून आले. आंदोलकांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेशालाही आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.(chandrapur shivparatishthan against sambhaji bhide ambedkarwadi sanghhatna)

जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या गळाला सांगलीतील एकही आमदार नाही

चंद्रपूरमध्ये संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील अग्रसेन भवन परिसरामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेशाला आणि बैठकीला उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केला. ही नियोजन बैठक उधळून लावण्याचा इशारा देत शेकडो कार्यकर्ते बैठकस्थळी पोहोचले.

kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…

उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र धारकऱ्यांसह पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी दोन्हीकडून जोरदार नारेबाजी झाली.

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना अटक केली आहे. चंद्रपुरात घटनाविरोधी-देशविरोधी संभाजी भिडे यांचे नियोजन हाणून पाडणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी अटकेनंतर व्यक्त केला आहे.

Tags

follow us