kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…

kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…

Chitra Wagh News : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणातल्या ताईने पुढे यावं, असं खुलं आव्हानच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिलं आहे. वाघ आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. कोल्हापुरात महिलांच्या सेवा संस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे.

Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका वृत्तवाहिनीने तो प्रसारित केला. त्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याचं दिसून आलं. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा विरोधकांनी चांगलाचं उचलून धरला होता. सोमय्यांनी महिलेचं शोषण केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

फ्रॅंचायझी देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याची 30 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

त्यावर आता चार दिवसांनी चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, अशा गोष्टी खासगी आणि वैयक्तिक असतात. त्या समोर आल्यानंतर आम्हाला धक्काच बसला होता. मात्र, आपण एकच बाजू पाहिली आहे. सोमय्यांवर जे आरोप होत आहेत त्यानूसार त्या ताईने पुठे यावं माझं खुलं आव्हानच असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

तसेच आज चार दिवस उलटूनही गेले आहेत, तरीही कोणीच पुढे आलेले नाही. त्या ताईने राज्यातल्या कोणत्याही पोलिस ठाण्यात अथवा कुणालाही संपर्क करुन गुन्हा नोंदवावा, जर तसं नसेल होत तर झिरो एफआयआरही दाखल करु शकता. राज्य सरकार त्यांचं काम करीत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सखोल चौकशीनंतर संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचं वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube