Devendra Fadnavis on Politics : ‘मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. विद्यार्थी परिषदेत असताना कारसेवक म्हणून गेलो. त्यावेळी कारसेवक म्हणून गेलो होतो. आम्ही सगळे बदायूंच्या जेलमध्ये होतो. सुनील आंबेकरांनी भाजपात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तेव्हा मी मला राजकारणात काम करायचं नाही’, असे सांगितले असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. निमित्त होतं अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोहाचं.
Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेसाठी कुणासोबत जाणार?, प्रचार सुरू असतानाच फडणवीसांचं मोठ वक्तव्य
नागपूर शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या जीवनातील एक जुना प्रसंग सांगितला.
फडणवीस पुढे म्हणाले, आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की मग आपल्याला काम करायचं असतं. निवडणुकीची तयारी करा असं मला पक्षानं सांगितलं होतं. त्यानंतर मला नागपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 69 मधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली. पक्षाने या निवडणुकीत मला निवडून आणलं. नगरसेवक झालो पण तो दिवस कालच घडल्यासारखा मला वाटतोय. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. खरंतर स्व. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांचा मला मोठा पाठिंबा मिळाला होता.
यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. एक अकेला देवेंद्र क्या करेगा असे सुळे म्हणाल्या होत्या. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण त्यावेळी त्यांना माहित नव्हतं की मी एकटा नव्हतो. आमचे कार्यकर्ते, नेते माझ्यासोबत होते.