Download App

Congress च्या स्थापना दिनी महारॅली; देशभरातील कॉंग्रेस नेते भाजपविरोधात एकवटणार

  • Written By: Last Updated:

Congress : 28 डिसेंबरला राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा (Congress) स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त नागपूरमध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या या 138 व्या स्थापना दिनामित्त या सोहळ्याला देशभरातील कॉंग्रेस नेते हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.

भाजपने अजितदादांना सोबत का घेतलं? रोहित पवारांनी सगळंच उघड केलं

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कार्यक्रमाबद्दल सांगितले की, हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असून मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे. तसेच नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच 1959 मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस साजरा होत आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Manoj Jarange : मुलाच्या नावामागं आईची जात लावायला काय हरकत? अजिदादांचं नाव न घेता जरांगेंचा हल्लाबोल

तसेच यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर टीका देखील केली. ते म्हणाले की, सध्या देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी,कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.

Fighter New Poster : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर रिलीज

ईव्हीएम संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएमवर लोकांमध्ये संशय आहे, त्याची दखल निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते.

Tags

follow us