अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘त्यांची निवड ही मॅनेज….’

अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘त्यांची निवड ही मॅनेज….’

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन कालची बैठक बेकायदेशीर असल्याचं सांगितले. तसेच काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बैठकीत घेतलेले निर्णयही बेकायदेशीर असल्याचे पटेल यांनी सांगितलं. दरम्यान, यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) प्रफुल्ल पटेलांचा जोरदार समाचार घेतला. (Jitendra Awhad On Ajit Pawar says National President is about manage)

जितेंद्र आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची घटना सांगते की, पक्षाचा अध्यक्ष लोकसभेचे खासदार किंवा विनाधसभेच्या आमदाराने पक्षविरोधात काही कारवाई केल्याचं लक्षात आलं तर त्याची पक्षातून हकालपट्टी करू शकतो. अध्यक्षांना कोणालाही पक्षाच्या बाहेर काढण्याचा अधिकार आहे. आणि अध्यक्षांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब वर्कींग कमीटीकडून होतं.

पटेल म्हणतात, NCP  च्या ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या पक्षाच्या घटनेनुसार झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला निलंबित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मग याचा अर्थ प्रफुल्ल पटेल यांना आतापर्यंतचे पक्षांचं काम बेकायदेशीर होते असे म्हणायचे आहे का? असा सवाल आव्हाडांनी केला.

Asim Sarode: नीलम गोऱ्हेनी पक्षप्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर 

अजित पवार पवार गटाने अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असा ठराव मंजूर करून तसं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं. यावरूनही आव्हाडांनी प्रुफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली असं पटेल सांगतात. पण, पटेल, तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात. आणि तुम्हाला कार्यध्यक्ष शरद पवारांनी केलं. त्यांच्या अधिकारातून तुम्हाला कार्याध्यक्ष करण्यात आलं. पण, आता तुमचीच हकालपट्टी त्यांनी केली. त्यामुळं अजित पवांराच्या नियुक्तीला काही आधार नाही, असं आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, अजित पवार गटाने अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलीच तरी कशी? तेही राष्ट्रीय निवडणूक समितीला न कळवता? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, 3 जुलै रोजी अजित पवार गटाची पत्रकार परिषद झाली. त्यात शरद पवार हेच आमचे दैवत आहेत. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं सर्व नेत्यांनी 3 जुलैला बोललं आहे. आता तेच नेते म्हणत आहेत की, आम्ही 30 तारखेला निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. या सर्व मॅनेजमेंटच्या बाबी आहेत, असंही आव्हाड म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube