मोदींच नाव आहे म्हणून गाफिल राहू नका, निवडणुकांपूर्वी फडणवीसांनी टोचले कान

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. पण ते म्हणाले की, मोदींचं नाव असलं तरी देखील गाफील राहू नका. विजयासाठी मेहनत घ्या असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. फडणवीस भाजपच्या नागपूरमधील प्रदेश पदाधिकारी बैठकीत […]

Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच..., देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका

Devendra Fadnavis

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. पण ते म्हणाले की, मोदींचं नाव असलं तरी देखील गाफील राहू नका. विजयासाठी मेहनत घ्या असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. फडणवीस भाजपच्या नागपूरमधील प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.

निवडणुकांपूर्वी फडणवीसांनी टोचले कान…

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा त्यासाठी पुढचे नऊ दहा महिने आपली पूर्ण कार्यक्षमता पक्षालाा देणे आवश्यक आहे. महायुती सरकारचे तीनही पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार आहे. त्यामुळे जिथे भाजपचा उमेदवार नसेल तो उमेदवार देखील मोदींसाठी निवडून येणार आहे.

Parliament Security : घुसखोरीआधी होता वेगळाच प्लॅन; दिल्ली पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती

त्याचबरोबर ही लोकसभा जिंकण्यासाठी आपलीच प्रतिष्ठा पणाला लावाायची आहे. दरम्यान विकसित भारत यात्रा काढण्यात येत आहे. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांचे कार्यक्रम यामध्ये होणार आहेत. यात्रा सरकरी आहे. या यात्रेमध्ये तुम्ही तुम्ही झेंडे घेऊन जाऊ नका असं मी म्हणत नाही.

Pune News : भाडोत्री खोली देणाऱ्या जागामालकांच्या खिशाला झटका; मनपाचा करवाढीचा प्रस्ताव रेडी

पण यात्रेसाठी लोकांची उपस्थिती आहेत की, नाही हे पाहणं. योजना लोकांपर्यंत पोहचली आहे की, नाही हे पाहणं. अशी कामं भाजप कार्यकर्त्यांनी करणं आपेक्षित आहे. सामान्य माणसांना मोदींचं आकर्षण आहे. मात्र येणारे दिवस अधिक सावधानतेने काढावे लागणार आहेत. कारण मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहे. असं म्हणत यावेळी एक प्रकरे फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना असाच संदेश दिला आहे की, जरी मोदी असतील तरी गाफिल राहु नका. कामाला लागा.

Exit mobile version