Devendra Fadnavis On INDIA : मुंबईमध्ये सुरु असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला कोणताही अजेंडा नाही, केवळ मोदी हटाओ हा अजेंडा घेऊन ते पक्ष एकत्र आले आहेत. अशा प्रकारचा अजेंडा कितीही आणला तरी जर लोकांच्या मनात मोदी आहेत, तर 36 पक्षच काय तर 100 पक्ष जरी एकत्र आले तरी देखील लोकांच्या मनातून मोदींना काढू शकत नाहित, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी नाव घेतलेले चांग चुंग-लिंग कोण?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घणाघाती टीका केली आहे. शेवटी लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत. मोदी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांच्या नेतृत्वामुळे आणि ज्याप्रकारे त्यांनी देशाला प्रगतीवर नेले आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या मनामध्ये मोदी आहे.
Gautami Patil: गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग रिलीज; ‘माझा कारभार सोपा नसतोय रं!’
ज्याप्रकारे आपला विचार न करता सर्वस्व मोदींनी देशासाठी दिले, म्हणून मोदी लोकांच्या मनात आहेत. हे काही पक्ष एकत्र आले आहेत, ते देशाचा विचार करण्यासाठी नाहीतर ते आपली राजकारणातली दुकानं बंद होणार असल्याच्या भितीने एकत्र आले आहेत. ही दुकानं वाचवण्यासाठी एकत्र येऊन आजपर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान पदासाठी दावा केला आहे, अशीही टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विरोधकांनी कितीही पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवले तरी ते जनतेला पटलं पाहिजे. यांचा कोणताही उमेदवार जनतेला पटत नाही. त्याच्यामुळे ठिक आहे ते एकत्रित येऊन बॅनरबाजी करुन आणि घोषणाबाजी करुन आपलाही टाईमपास करत आहेत, त्यामुळे याचा कोणताही परिणाम होईल असं मला वाटत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आघाडीवर केली आहे.