पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी नाव घेतलेले चांग चुंग-लिंग कोण?
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्यावरून मोदी सरकारला (Modi Government) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुद्दे आणि गंभीर आरोप यावेळी राहुल गांधींनी केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी चांग चुंग-लिंग या व्यक्तीचे नाव घेतले. ही व्यक्ती नेमकी कोण आणि त्याचा अदानींशी संबंध काय हे आपण जाणून घेऊया. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Who Is Chang Chung Ling)
सेबी, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? चीनी व्यक्तीचा सहभाग कसा? राहुल गांधी आक्रमक
मध्यंतरी आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर काँग्रेसने हा मुद्दा चीनशी जोडला होता. तसेच अदानी यांचे चिनी उद्योगपती चांग चुंग-लिंग (Chang Chung Ling) यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच चांग चुंग-लिंग आणि अदानी हे व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा पवन खेडा यांनी करत केला होता.
कोण आहे चांग चुंग-लिंग ?
चांग चुंग-लिंग गुडामी इंटरनॅशनल नावाची कंपनी चालवतात. हिंडनबर्गच्या अहवालात चौकशी दरम्यान गुडामी इंटरनॅशनल लिमिटेड समोर आली होती. चांग चुंग-लिंग यांनी गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांचा सिंगापूरमधील कॉर्पोरेट रेकॉर्डचाही हवाला या अहवालात देण्यात आला होता.
‘देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा’; नाना पटोलेंची जहरी टीका
चार वर्षांपूर्वी आले प्रसिद्धीझोतात
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याची चर्चा होत असताना म्हणजे 2018 मध्ये गुडमी इंटरनॅशनल प्रसिद्धीझोतात आली. सिंगापूरच्या तीन कंपन्यांपैकी एक म्हणून या कंपनीचे नाव होते. प्रकाशित वृत्तांनुसार गुडामीने मॉन्टेरोसा इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज अंतर्गत अनेक फंडांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यात एकत्रितपणे अदानी संस्थांमध्ये 4.5 अब्ज डॉलर्स किमतीचे स्टेक आहेत.
यूएस रिसर्च फर्मनुसार, चांग चुंग-लिंग यांचा मुलगा पीएमसी प्रोजेक्ट्सचा मालक आहे. तैवानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो अदानी ग्रुपचा तैवान प्रतिनिधी देखील आहे. तथापि, अदानी समूहाने 2017 च्या डीआरआय रेकॉर्डचा हवाला देऊन पीएमसी आणि समूह यांच्यातील कोणताही संबंध नाकारला आहे.