‘देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा’; नाना पटोलेंची जहरी टीका

‘देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा’; नाना पटोलेंची जहरी टीका

राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच(Devendra Fadnvis) आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवनातून नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे, त्यावर बोलताना नाना पटोलेंनी विरोधकांचा चांगलाचं समाचार घेतला आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या नागरी समस्यांनी वेधलं लक्ष; संग्राम जगतापांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारपदावरून स्पर्धा सुरु असून अजित पवार यांच्या दादागिरीचा अनुभव मविआ सरकारने पाहिलायं, पण सध्या त्यांच्या दादागिरीला चाप लावला असल्याची जहरी टीकाही नाना पटोले यांनी अजितदादांवर केली आहे.

Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

तसेच राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पिण्याचे पाणी नाही, चारा नाही, त्याकडे सरकारचे लक्ष नाही आणि तिन्ही पक्षात खुर्चीच्या वर्चस्वाची लढाई सुरु असून दोन दिवसापूर्वी मंत्रालयात शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन आंदोलन करत सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला, पण या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आहे पण अजून 17 जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकत नाहीत. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र, खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

मोठी बातमी! कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा, लोकसभेतील निलंबन रद्द

दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला होत असलेल्या खर्चावरुन शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनी टीका केली आहे. उदय सामंतांनी खर्चाचा अहवालच पत्रकार परिषदेत मांडल्याचं दिसून आलं आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी मेजवानी नाही तर वडापाव, झुणका भाकर आणि पुरणपोळी अशा महाराष्ट्राचे खाद्यपदार्थांचे नियोजन केलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

मनसेने सरकारला जाब विचारावा :
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, याची आम्हाला जाणीव आहे, देशभरातून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेनुसार केले जाणार आहे. झुणका भाकर, वडापाव व पुरणपोळी हे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ जेवणात असणार आहेत, ही मेजवानी कशी? राज्यात दुष्काळी परिस्थितीला तिघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, मनसेने सरकारला जाब विचारला पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube