कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या नागरी समस्यांनी वेधलं लक्ष; संग्राम जगतापांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र

कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या नागरी समस्यांनी वेधलं लक्ष; संग्राम जगतापांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र

Ahmednagar Cantonment Board : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना दुमजली बांधकाम, आरोग्य सुविधा, लष्करी हद्दीजवळ बांधकाम अशा विविध मागण्याचं साकडं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्याकडे घातलं आहे. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री राजनाथ सिंह आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी समस्यांकडे मंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात जगताप यांनी पत्रच सिंह यांना दिलं आहे.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

राजनाथ सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटलं, कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर अहमदनगर शहराचा विकसनशील भाग असून इथे मोठ्या प्रमाणात इमारती व बहुमजली व्यापारी संकुले बांधणे आवश्यक आहे. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या काही नियमांमुळे येथील समस्यांबाबत नागरिक आणि विकासक चिंतेत आहेत.

Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ

कॅन्टोन्मेंट बोर्ड दुमजली इमारतीला परवानगी देत नाही. संरक्षण विभागाच्या नियमांनुसार, एखाद्याला लष्करी आस्थापनांजवळ एकमजली इमारत बांधायची असेल तर 100 मीटर आणि बहुमजली इमारतीसाठी 500 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. कडक नियमांमुळे नागरिकांना त्या ठिकाणांचा योग्य विकास करता येत नसल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.

8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’

कॅन्टोन्मेंटच्या नियमांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहराचा विस्तार आणि विकास मर्यादित झाला आहे. त्यामुळे या हद्दीतील लष्करी आस्थापनांजवळील बांधकामासाठी अंतराच्या नियमामध्ये बदल करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

Chandrayan 3 : ‘हॅलो पृथ्वीवासियांनो, लवकरच चांगली….; प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास संदेश

तसेच नागरिकांना सुविधा देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून पगार मिळत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळण्याची अपेक्षा असतानाही केंद्र शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचं निवदेनात म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदनगर शहरानजीकच असलेल्या कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी कॅन्टोन्मेंटच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube