सेबी, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? चीनी व्यक्तीचा सहभाग कसा? राहुल गांधी आक्रमक

सेबी, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? चीनी व्यक्तीचा सहभाग कसा? राहुल गांधी आक्रमक

Rahul Gandhi on Gautam Adani : अदानीच्या माध्यमातून परदेशात 1 बिलिअन डॉलरची गुंतवणूक केली गेली आहे. हा पैसा अदानींचा आहे की आणखी कोणाचा? सीबीआय आणि ईडी अदानींच्या व्यवहारांची चौकशी का करत नाहीत? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार की नाही? या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली आहे.

राहुल गांधी हे इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दाखल होताच त्यांना हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि गौतमी अदांनी यांच्यावर निशाणा साधला. वृत्तपत्रांचा दाखला देत त्यांनी अदानींच्या गुंतवणूकीवर प्रश्न उपस्थित केले. देशातील काही उद्योगपतींच्या कुटुंबियांशी काहीचं संबंध आहे. त्यातून पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली. अदानीच्या माध्यमातून परदेशात 1 बिलिअन डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कामासाठी मास्टरमाईंड विनोद अदानी आहे, त्यांच्यासोबत नासिर अली शबान अली आणि चंगचुंग लींक हे लोक आहेत. या प्रकरणात चायनीज लोक कसे काय? हे अदांनी याचे पैसे आहेत की दुसऱ्या कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला.

Gautami Patil: गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग रिलीज; ‘माझा कारभार सोपा नसतोय रं!’ 

ते म्हणाले, सेबीने अदानींना क्लिन चीट दिली. ज्या अधिकाऱ्यांने अदानींना क्लिन चीट दिली, तोच अदानींच्या कंपनीत मोठ्या पदावर आहे. सेबीचे प्रमुख अदानींच्या संस्थेत काम करतात, असं सांगत काहीतरी चुकीचं घडतंय असं सांगितलं.अदानी देशातील कोणतीही गोष्ट खेरदी करू शकतात, मग ते धारावी असो की मुंबई विमानतळ? अदानींच्या गुंतवणूकीतील पैसा कोणाचा? अदानींचा की आणखी कोणाचा?

पंतप्रधान मोदी आणि अदानींचं काय नातं आहे. ते फक्त अदांनींनाच केंद्रीय यंत्रणापासून का संरक्षण देत आहेत? अदानींनाच मोठी कंत्राट कशी मिळतात? सेबी, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? असे सवाल करत अदानी प्रकरणी ती मोदींनी जेपीसी मार्फत चौकशी करावी, अशी मागणा राहुल गांधींनी केली.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube