Gautami Patil: गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग रिलीज; ‘माझा कारभार सोपा नसतोय रं!’

Gautami Patil: गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग रिलीज; ‘माझा कारभार सोपा नसतोय रं!’

Gautami Patil New Song: खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या (Gautami Patil ) रुपावर आणि नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला आहे. सध्या तरुणाईमध्ये तर तिचे प्रचंड वेड आहे. (Gautami Patil New Song) प्रत्येक गावागावात सध्या तिच्या कार्यक्रमांना गोंधळ आणि गर्दी बघायला मिळत असते. (Social media) नुकतेच तिचं “माझा कारभार सोपा नसतोय र” हे नवं आयटम साँग गाणं समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)


यामध्ये गौतमीची कातिल अदा बघायला मिळत आहे. (Item Song) सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंट्स सध्या चाहते जोरदार करताना दिसत आहे. नवं आयटम साँग गाणं समोर येता तरुणाई पुन्हा एकदा गौतमीच्या तालावर थिरकत असल्याचे बघायला मिळत आहे. गौतमीने सध्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या गाण्याची एक हटके झलक शेअर केली आहे.

डान्सर गौतमी पाटील आता अभिनेत्री म्हणून ओळखली जाणार आहे. तिच्या पहिल्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘घुंगरू’ असं गौतमीच्या पहिल्या मराठी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचे शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशात देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडबरोबर स्क्रीन शेअर करताना बघायला मिळणार आहे.

Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स अन् अ‍ॅक्शन सीन्स; किंग खानचा धमाकेदार ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

तसेच सबसे कातिल गौतमी पाटील असणाऱ्या गौतमीच्या पहिल्या सिनेमाचा टिझर देखील प्रदर्शित झाला आहे. घुंगरू असं या सिनेमाचं नाव आहे. घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसतेय. स्त्री म्हणून अन्याय झालेली एक लावणीसम्राज्ञी म्हणून गौतमी दिसतेय.काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या सिनेमाबद्दल माहिती दिली होती. गौतमी म्हणाली… “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube