Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निशाण्यावर पुन्हा मोदी अन् अदानीच; परदेशातून आणलेला पैसा नेमका कोणाचा?

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निशाण्यावर पुन्हा मोदी अन् अदानीच; परदेशातून आणलेला पैसा नेमका कोणाचा?

Rahul Gandhi : भारताचा पैसा गौतम अदानींच्यामार्फत परदेशात पाठवून पुन्हा भारतात आणला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) आणि उद्योजक गौतम अदानी(Gautam Adani) यांच्यात अर्थिक हितसंबंध असल्याचे पुरावेच पत्रकार परिषदेत मांडले आहेत. जागतिक वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींनी गौतमी अदानी आणि मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Ahmednagar Crime : ‘ती’ ला त्रास देऊन तो पळाला, पोलिसांनी त्याला पुण्यात गाठला

राहुल गांधी म्हणाले, अदानींनी भारतातला पैसा परदेशात नेला आणि पुन्हा भारतात आणला आहे, अदानींच्या माध्यमातून भारताबाहेर गेलेला पैसा कुणाचा? भारतातून जवळपास 1 बिलियन डॉलर अदानींच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात पाठवण्यात आले असून त्या पैशांतूनच अदानी एअरपोर्ट, धारावीसारखे प्रकल्प घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत

भारतातून परदेशात गेलेला पैसा नेमका कोणाचा आहे? हा पैसा अदानींचा आहे की आणखी कोणाचा? या कामासाठी मास्टरमाईंड विनोद अदानी आहेत, त्यांच्यासोबत नासिर अली शबान अली आणि चंगचुंग लींक हे लोकं आहेत, यांचं अदानी यांच्याशी संबंध काय आहे? या प्रकरणामध्ये चायनीज लोकं कसे काय? असे सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केले आहेत.

दरम्यान, जागतिक वर्तमान पत्रांमध्ये मोदींच्या जवळच्या परिवाराने परदेशात पैसा गुंतवल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि गौतम अदानी यांचा संबंध काय आहे? असा सवाल उपस्थित करत भारतीय मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात येत असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणी ईडी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे, पण या प्रकरणावर तपास केला जात नसल्याचा आरोप गौतम अदानी यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube