Download App

राज्यात आणखी एका पुतण्याचे बंड ! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघेंचा पुतणा काँग्रेसमध्ये

Dr. Abhyuday Meghe Nephew of Datta Meghe Join Congress: वर्धातून विधानसभा लढविण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे.

  • Written By: Last Updated:

Dr. Abhyuday Meghe Nephew of Datta Meghe Join Congress : लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यात सर्वाधिक जागा लढणाऱ्या भाजपला मोठा दणका बसला होता. पण आता विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) पूर्वीच भाजपला (BJP) एक मोठा धक्का बसला आहे. वर्धातील भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे (Datta Meghe) यांचे घर फुटले आहे. त्यांचा पुतण्या आणि मेघे विद्यापीठाचे डॉ. अभ्युदय मेघे ( Dr. Abhyuday Meghe) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश केलाय. हा भाजपला धक्का आहे. त्याच बरोबर मेघे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जरागेंनी फडणवीसांवर टीका करणं थांबवावं, त्यांनी गोलमेज परिषद घ्यावी अन्…; राधाकृष्ण विखे भडकले

मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी डॉ. अभ्युदय मेघे यांचे पक्षात स्वागत केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. नाना पटोले यांनी त्यांना उमेदवाराची शब्द देऊन पक्षात घेतल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले यांनी भाजपला धक्का देत एक चाल खेळली आहे. लोकसभेला काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पक्षामध्ये पुन्हा इनकमिंग करून पक्षाची ताकद पटोले हे वाढवत आहे. विदर्भात काँग्रेसला कसे जास्त बळ मिळेल, याची रणनिती पटोले यांनी आखलेली आहे.

Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा


अभ्युदय मेघे कोण आहेत ?

अभ्युदय मेघे हे जेष्ठ नेते दत्ता मेघे यांचा पुतणे आहेत. दत्ता मेघे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसकडून चारवेळा वर्धा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर ते राज्यसभेवर होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे ते आहेत. अभ्युदय मेघे यांचा सामाजिक कार्यक्रमातून जनतेशी नाळ जोडलेली आहे. अभ्युदय मेघे यांचे वर्धा सोशल फोरम असून तेच त्याचे अध्यक्षही आहेत.


वर्धा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार

पक्ष निकष पाळण्याची सूचना असल्याने त्यानुसार मी सोपस्कार पूर्ण केले. मला तिकीट द्यायची की नाही हे पक्षातील नेते ठरवतील. वर्धातून विधानसभा लढविण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे. तसा अर्ज मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला असल्याचे अभुदय मेघे यांनी सांगितले.

follow us