Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यामध्ये नेहमीच टीका-टिप्पणी सुरू असते. यावेळी देखील महाजन यांनी खडसे यांच्यावर यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्यावर लवकरच उपचार करावे लागतील. तसेच त्यांना एवढे दंड झाले आहेत की, त्यांना चप्पल घेण्यासाठी ही पैसे उरलेले नाहीत. अशी टीका महाजनांनी केली.
‘…तर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफीची’; सुप्रिया सुळेंनी ठणकावूनच सांगितलं
यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मला त्यांच्यावर लवकरच इलाज करावा लागेल. महाराष्ट्र आणि पूर्ण जळगाव जिल्हा या गोष्टीचा साक्षीदार आहे. की, मी कितीतरी हजार विद्यार्थ्यांच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. मी कुठे जातो? कोणत्या जेलमध्ये होतो? हे सर्वांना माहिती आहे. मात्र हा माणूस बिचारा सर्व गोष्टींमधून हरलेला आहे. एवढे दंड झालेले आहेत की, त्यांच्याकडे चप्पल घेण्यासाठी पैसे उरलेले नाहीत. अशी टीका यावेळी मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली.
‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाचा ‘या’ दिवशी तिढा सुटणार? तारखेचा सस्पेन्स हटवला
दरम्यान गेल्यावेळी देखील या दोघांनी एकमेकांवर मानसिकस्थितीवरून खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावेळी देखील महाजनांनी खडसेंच्या मानसिकस्थितीवरून टीपण्णी केली होती. त्यावर खडसे म्हणाले होते की, माझी मानसिक स्थिती खराब आहे की, चांगली आहे हे लोकांनीच ठरवावे. मी नाही, मात्र गिरीश महाजन यांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. कारण मी त्यांना जे प्रश्न वारंवार विचारत आहे. त्याचे उत्तरं देखील ते देऊ शकत नाहीत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडसे-महाजन यांच्यामध्ये सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप खडसेंनी महाजनांवर केल्यापासून जोरदार खडाजंगी सुरू झालेली आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी सभागृहात केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली होती.