Download App

काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’; राहुल, सोनिया गांधीसह दिग्गज नेते नागपूरात

  • Written By: Last Updated:

Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे.

येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे. काँग्रेसे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. या रॅलीला राज्यभरातील 10 लाख काँग्रेस कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात विदर्भाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जात होते. मधल्या काळात भाजपने हा बालेकिल्ला आपल्याकडे घेतला होता. पण मधल्या काळात काही निवडणुकामध्ये काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देखील विदर्भातून गेली होती. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळला होता.

काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी देखील विदर्भातून येतात. बाळासाहेब थोरात यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे हे पद दिले गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांचे विधानसभेतील त्यांचे संख्याबळ कमी झाले होते. यानंतर विधानसभेतील विरोधीपक्ष नेते काँग्रेसकडे आले होते. यावेळी देखील विदर्भातील विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली आहे.

सध्या विदर्भातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्यासारखे काँग्रेसचे दिग्गज नेते विदर्भातूनच येतात. आता वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रसने विदर्भावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

follow us