गुलाबराव पाटलांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना सोडण्याचं कारण…

जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगावमधील भवरखेडा इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही […]

GULA

GULA

जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य

दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगावमधील भवरखेडा इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, टीका करणारे टीका करीत आहेत, पण कोणी सरपंच पदाचाही राजीनामा देत नाहीत. आम्ही तर आठ जणांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचं मंत्री पाटील म्हणाले आहेत.

शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप

तसेच जर का आकडा जमला नसता तर तेरा क्या होता गुलाबराव…या शब्दांत त्यांनी जनतेला सवालही केला आहे. आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना प्रमुखांनी ज्या हिंदुत्वासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेसाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version