Download App

भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नोटीस

  • Written By: Last Updated:

Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या ईडीनंतर आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर आल्या आहेत. आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग (Money laundering) केल्याचा आऱोप आहे. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस देण्यात आल्याचे समजतं. गवळी यांच्या विरोधात 18 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि 7 कोटी रुपयांची रोकड चोरी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. आता ही सर्वाचा तपशील गवळी यांना द्यावा लागणार आहे.

पुण्यात ठरणार भाजपच्या ‘महाविजया’ ची रणनीती; 7 जानेवारीला खास बैठक 

भावना गवळी या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार आहेत. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराबाबत प्राप्तिकर विभागाने 29 डिसेंबर रोजी नोटीस बजावली आहे. भावना गवळी यांना 5 जानेवारीपर्यंत आयकर विभागाकडे उत्तर सादर करावे लागणार आहे.

12 मे 2020 मध्ये भावना गवळी यांनी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की त्यांच्या स्वीय सहाय्यकाने संस्थेच्या कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. त्याच आधारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर निशाणा साधला होता. सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित करत गवळींकडे एवढा पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये 18 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.

PM Modi ‘बस मणिपूर नही जायेंगे’ म्हणत मोदींच्या लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंवर काँग्रेसचा हल्लाबोल 

महिला प्रतिष्ठानेच कंपनीत रूपांतर करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात गैरव्यवहार झाला. 7 कोटी रुपयांच्या रोख रकमेचाही गैरवापर झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, महिला व तरुणांनी प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची सुरुवात खासदार भावना गवळी यांनी केली होती. खासदार गवळी या स्वतः फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. या फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय, शिरपूरमध्ये फार्मसी इन्स्टिट्यूट, पब्लिक स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, निवासी शाळा, वाशिम आणि यवतमाळ जन शिक्षण संस्था चालवल्या जातात. उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये 18 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची आरोप आहे. आयकर विभागाला आता त्याच महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील गैरव्यवसहाचा रुपयांचे हिशोब हवा आहे. त्यासाठीच प्राप्तिकर विभागाने गवळी नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

follow us